जालना । प्रतिनिधी – बदलापुरात दोन चीमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आज गुरुवारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे काल बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल आणि युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आल्यानंतर आज सलग दुसर्या दिवशी देखील काँग्रेस पक्षाने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून शिष्ट मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंट्याल,अक्षय गोरंट्याल, सौ. सुषमाताई पायगव्हाणे, चंदाताई भांगडीया, शितलताई तनपुरे, मंगलताई खांडेभराड, मंदाताई पवार, रमेश गौरक्षक, महावीर ढक्का, दिनकर घेवंदे, वैभव उगले, वाजेद पठाण, संदिप खरात, बदर चाऊस, शेख अझहर, राज स्वामी, संतोष माधोवाले, जीवन सले, बाळकृष्ण कोत्ताकोंडा, अशोक नावकर, राहुल खरात, संजय भगत, किशोर गरदास, आनंद वाघमारे, शेख शकील, विष्णू वाघमारे, राधाकिसन दाभाडे, करीम बिल्डर, योगेश पाटील, शेख इब्राहिम, करीम बिल्डर, फकिरा वाघ, गोपाल चित्राल, इर्शाद शेख, किशोर कदम, संजय पाखरे, विलास जगधने, साळवे, शेख शमशोद्दीन,छोटू चित्राल,आलोक सरवडीकर, संजय आल्हाट, राम देठे, संजय खरात,सदाशिव भुतेकर, सागर ढक्का, रघुवीर गूढे,गजाजन शेजुळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवार दि.24 ऑगस्ट 2024 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी जालना शहरातील व्यापारी, व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक आणि सर्वच घटकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आ. कैलास गोरंटयाल, माजी नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल, युवा नेते अक्षय गोरंटयाल आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.