भारतीय संविधान जनजागृती संघ जालना भारत बंद मध्ये सहभागी

9

जालना । प्रतिनिधी – भारतीय संविधान जनजागृती संघ जालना यांच्या वतीने भारत बंद आंदोलनात सहभागी राहुन मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.01/08/2024 ला संविधान विरोधी निर्णय मूळ संकल्पनेला उप वर्ग आणि क्रिमिनियल अ,ब,क,ड ला विरोधासह बाकी मागण्या संदर्भात संविधान जनजागृती संघाचे प्रमुख मार्गदर्शन आयु.सुदामराव सदाशिवे मा.सभापती जि.प.जालना यांच्या वतीने मा.श्री.पांचाळ साहेब, जिल्हाधिकारी जालना यांच्या द्वारा मा.राष्ट्रपती व मा.पंतप्रधान यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रमुख मागण्या – अनुसूचित जाती, जमातीमध्ये उपवर्गीकरणाद्वारे फूट पाडणार्या केंद्र सरकारच्या दुष्ट कावेबाज नीतीविरोधात लढा, सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या अनुसूचित जाती,, जमातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय संसदेने घटनादुरूस्ती करून त्वरीत रद्द करावा., सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी., खासगी क्षेत्रातही अनुसूचित जाती, जमातींसाठी घटनादत्त आरक्षणाचे धोरण लागू करण्यात यावे., पदोन्नतीसह आरक्षण धोरणाची संपूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी., गेल्या पंधरा वर्षात देशभरात एकूणच आरक्षणाची किती अंमलबजावणी झाली, याबाबत केंद्र आणि राज्य सरकारानी श्‍वेतपत्रिका त्वरीत प्रसिद्ध करावी., आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना अनुसूचित जाती व जमातींना क्रिमी लेयर लावणे हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबतचे धोरण स्पष्ट करावे., केंद्र सरकारनी एससी, एसटी आरक्षणसाठी एक अध्यादेश कानून बनवून तो संविधानातल्या अनुसूची 9 मध्ये समाविष्ट करणे त्यामुळे कोणतेही न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही., उच्चपदस्थ सरकारी सेवांमध्ये केंद्र आणि राज्स रकारे यांनी लॅटरल एन्ट्रीद्वारे चालवलेली नोकर भरती त्वरीत बंद करण्यात यावी., मा.उच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती न्यायिक नियुक्त आयोग्यची स्थाना करून आयोगाद्वारा परिक्षा घेवून त्यांची निवड करावी. वृत्तमान कॉलेजियम प्रणाली द्वारा रद्द करण्यात यावी. प्रमुख उपस्थिती डी.आर.हिवराळे अध्यक्ष, प्रकाशजी गडवे सचिव, सदानंद टवले कार्याध्यक्ष, भास्कर खंदारे, केशव पगारे, शंकर भालेराव, सोनाजी नावकर, कृष्णा ढगे, रामदास गवई, देविदास धिराडे, एम.एन.पाथरे, माधवराव सारवाडीकर, शांताराम रायपुरे, भिमराव पैठणे, मिलिंद धनेधर, एस.टी.मनवर साहेब सह सर्व संविधान प्रेमी हजर होते.