मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; इच्छूक व पात्र ज्येष्ठ नागरीकांसाठी संपर्क यादी जारी

49

जालना – सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या 6 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणार्‍या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या शारीरिक असमर्थता व दुर्लभतेनूसार सहायभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता एकवेळ एकरकमी तीन हजार रूपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तीक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेकरीता राज्य शासनातर्फे अर्थसहाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दि. 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असलेले ज्येष्ठ नागरीक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच या योजनेच्या अंमलबजावणी व लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आयुक्त व जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/मतदानकार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी इच्छूक व पात्र ज्येष्ठ नागरीकांनी पुढील कार्यालयाशी संपर्क साधावा.

जालना शहरी-मुख्याध्यापक-श्रीमती एस.बी.गोसावी, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना, जालना ग्रामीण-गृहपाल आर.एस.कर्दळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना, जालना ग्रामीण – गृहपाल ए.ए.होरशिळ, संत रामदास मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना, बदनापूर-मुख्याध्यापक डी.एम. गिरी, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर, भोकरदन-मुख्याध्यापक खेडेकर, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळा, भोकरदन, जाफ्राबाद- समतादूत कमर शेख, मो.नं. 9545767143 या क्रमांकावर संपर्क करावा. समतादूत अतिश बेंडे. मो.नं. 9604010239 या क्रमांकावर संपर्क करावा. मंठा – गृहपाल श्रीमती पी.एम.पोटोळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह, मंठा, परतूर – समतादूत रेखा बोर्डे, मो.नं. 7499008818 या क्रमांकावर संपर्क करावा. घनसावंगी – गृहपाल जे.एम. कर्णाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी, अंबड – गृहपाल संजय पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी.

सदर कार्यालयातून विनामुल्य अर्ज घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी केले आहे.