जालना । प्रतिनिधी – राज्यात होत असलेल्या साप्ताहित वृत्तपत्रावर होत असलेल्या अन्यांयाविरूध्द आज मंगळवार दि.20 ऑगस्ट रोजी जालन्यात व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले यावेळी सरकारने केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्यायाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विविध योजना ची घोषणा करण्यात येत आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी, प्रसिद्धीसाठी, राज्यातील मोठ्या आणि निवडक दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित करणे, त्याचबरोबर आकाशवाणी, सोशल मीडिया, डिजिटल माध्यम, व्हॉइस माध्यम यांच्यामार्फत प्रसारण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु संपूर्ण राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्र हे आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या सर्व योजनांची माहिती साप्ताहिक वृत्तपत्रातून जास्तीत जास्त जागेमध्ये जनतेपर्यंत पोहोचवत आहे. परंतु या जाहिरात शेडूल मधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेडूल मधून वगळण्यात आले होते. यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटने कडून आवाज उठवला होता. परंतु त्यावेळी सर्व जाहिरातीचे वितरण झाले आहे. पुढच्या वेळी नक्की प्राधान्य देऊ असे सांगण्यात आले होते. असे असूनही पुन्हा आपल्याकडून साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेडूल मधून वगळण्यात आले आहे हे साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्याय करणारे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनमान्य वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंधनकारक असताना, 2017 आणि 2019 चा जाहिरात धोरणाचा आदेश अन्याय करणारा आहे. हा आदेश त्वरित रद्द करून पुन्हा दैनिकांच्या बरोबरीने साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या वतीने करण्यात येत आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास मात्र आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. दिलेल्या निवेदनामध्ये 15 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयात दुरुस्ती करून साप्ताहिक वृत्तपत्रांचा समावेश करावा, साप्ताहिक वृत्तपत्रांना दैनिकाप्रमाणेच प्रासंगिक जाहिरातीचे वितरण करावे, वर्षभरामध्ये नैमित्तिक पाच जाहिरातीचे वितरण पुन्हा चालू करावे, अकोला येथील पत्रकार शंकर रामराव जोगी यांना टोल नाक्यावर मारहाण केलेल्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, 2017 व 2019 यावर्षी साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करणारा जाहिरात बंदीचा आदेश त्वरित मागे घ्यावा, पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना विशेष जाहिरात देण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी, जिल्हाध्यक्ष सय्यद मुश्ताक, जिल्हा सरचिटणीस अशफाक पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष नदीम कुरेशी, जिल्हाउपाध्यक्ष चेतन पाटील, जिल्हासचिव शेख मुजीब, जिल्हाकोषाध्यक्ष तौफिक पठाण, जिल्हा संघटक अझीम खान, सचिन सरवे, शेख जावेद, नाजीम मणीयार, आमेर खान, बासीत बेग यांच्यासह असंख्य पत्रकार उपस्थित होते.