टेंभुर्णी – येथील नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचलित नवभारत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णी कर्ज होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक पंजाबराव सोळंके सर, प्राध्यापक सुनील बनसोडे, प्राध्यापक रामदास भांगे हे होते. प्रास्ताविक सूत्रसंचालन डॉक्टर आनंद जाधव यांनी केले. विद्यार्थिनीने आम्ही आमच्या लाडक्या भावांना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमा आयोजित करतो आहोत असे सांगितले. त्याबद्दल भावना व्यक्त करताना डॉक्टर आनंद जाधव यांनी पुराणातील दाखले दिले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपप्राचार्य देशमुख सर यांनी सांगितले की हा संस्कृतीजन्य कार्यक्रम असून, संस्कृत दिन नारळी पौर्णिमा या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक संस्कृतीचे कार्यक्रम आज असून त्यापासून मानवी जीवन व समाज जीवन समृद्ध होते. विद्यार्थ्यांनी या रक्षाबंधनाच्या कार्यक्रम बोध घ्यावा आणि आपल्या बहिणीचे रक्षण करावे हीच या पाठीमागची भावना आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून प्रतिपादन केले. हे विश्वचि माझे घर, ही संकल्पना यातून पुढे आलेली आहे. संस्कृती जतन आणि जपणूक करण्याच्या पलीकडे आपण जाऊन सण साजरे केले पाहिजेत आणि समाज समृद्ध केला पाहिजे असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगति व्यक्त केली. नंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्ष स्थानावरून प्राध्यापक देशमुख यांनी सांगितले की या बंधू-भगिनींना कार्यक्रमानिमित्त गोड गोड दिले पाहिजे म्हणून त्यांनी गोडधोडचं वाटप केलं. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.