जालना । दीपावली सणानिमित्त खरेदी करतांना ऑनलाईन खरेदीस फाटा देऊन स्थानिक उत्पादक, व्यापारी, विक्रेते यांना प्राधान्य द्यावे, जेणेकरून उत्कृष्ट सेवे सोबतच स्थानिकांना आधार मिळेल. असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई कैलास गोरंट्याल यांनी आज येथे बोलतांना केले.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर उडान ग्रुप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील गुरु गणेश भवन येथे आयोजित दोन दिवसीय महा खरेदी मेळाव्याचे उद्दघाटन शनिवारी ( ता. 15) माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रुपच्या संस्थापिका सौ. कीर्ती अग्रवाल, नसीम शेख, सुजाता मुथा, दिपाली सावजी, रेखा रुणवाल ,दीपा भानुशाली, अर्पिता म्हसणे ,रचना धनानी, दिपाली राऊत, नीता वझरकर ,अनुराधा भोसले, अनिता अग्रवाल, नीता जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगार, त्यांच्या कलात्मक कौशल्यांतून उत्पादित वस्तूंना बाजारपेठे सह कायम स्वरूपी ग्राहक ते उत्पादक यांचा समन्वय उडान ग्रुपच्या संस्थापिका सौ. कीर्ती अग्रवाल यांनी साधला असून त्यांचे कार्य महिलांना उभारी देणारे आहे. असे नमूद करत जालनेकरांनी खरेदी मेळाव्यातून खरेदी करावी असे आवाहनही सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी केले.
महाखरेदी मेळाव्यात खास दीपावली निमित्त तयार केलेले दागिने, पूजा साहित्य ,देवांची वस्त्रे,तोरण, रंगीबेरंगी रांगोळी, गुजराती, राजस्थानी फराळ, मुखवास, महिला, मुलींसाठी नक्षीकाम केलेले फॅशनेबल, डिझायनिंग ड्रेसेस, साड्या, पैठणी, सौंदर्यप्रसाधने, इंडो, वेस्टर्न ज्वेलरी, मॅजिक टॉवेल, टिशू पेपर, पालेभाज्या, फळे, कापण्यासाठी लागणारे साहित्य ,आकर्षक दागिने ,देवांची आभूषणे, वस्त्रे, चॉकलेट ,नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, केसांची निगा राखण्यासाठी शाम्पू ,तेल, बालकांची बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी असलेले शैक्षणिक संस्थांचे साहित्य, चॉकलेट्स, कारले लोणचे, मसाले, पादत्राणे, आयुर्वेदिक तांबूल, रसायनमुक्त गुळ पावडर, तेल , विविध प्रकारच्या शेवया, वेगवेगळ्या फ्लेवरचे सरबत, केक, पावडर, चमचमीत खाद्यपदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची 65 दालने थाटली असून पहिल्याच दिवशी महा खरेदी मेळाव्यास यांनी जालनेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. दरम्यान रविवारी सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत महा खरेदी मेळावा सुरू राहणार असून जालेकरांनी खरेदीचा लाभ घ्यावा. असे आवाहन ग्रुपच्या संस्थापिका सौ. कीर्ती अग्रवाल यांच्यासह उडान ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.