सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट वायरल करू नये, शहराची तसेच जिल्ह्याची शांतता भंग होईल असे कृत्य कोणीही करू नये असे केल्यास संबंधितावर कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करून तडीपार करण्यात येईल असे कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी आज दिनांक 19 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता नागरिकांना आवाहन केले आहे. पुढे बोलताना पो.निरि.माने म्हणाले की शहराची शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सोशल मीडियाच्या गैरवापर करणाऱ्यांवर तसेच आक्षेपार्ह पोस्ट वायरल करणाऱ्यांवर किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांवर सायबर शाखेची करडी नजर आहे.त्यानुसार कडक कारवाई करण्याच्या इशारा पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी दिला.