रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी..
बदनापूर – तालुक्यातील बदनापूर शहरात रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय. यावेळी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मुस्लिम समाज भावना दुखावल्याने आक्रमक झालाय. दरम्यान आज जालन्याच्या बदनापूर शहरात मुस्लिम बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केलीय. यावेळी मुस्लिम बांधवांनी पोलिस निरीक्षकांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केलय. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.