मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना; 2 लाख 90 हजार 871 अर्जांना मान्यता

35

जालना- महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण’ साठी जिल्ह्यातील 2 लाख 90 हजार 871 बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. ‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना’ जिल्ह्यात राबविण्यात येत असून महिलांच्या नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यात 3 लाख 566 महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी होऊन आतापर्यंत 2 लाख 90 हजार 871 जणींच्या अर्जांनां मान्यता देण्यात आली आहे. 6 हजार 399 जणींच्या अर्जांवर निर्णय झालेला नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रलंबित अर्जांबाबत अशा बहिणींकडून राहिलेल्या त्रुटी वा अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यानंतर अंतिम निर्णय होईल.