महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व श्री अजीत पवार यांचा जाहीर निषेध!

54

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांनी ब, क वर्ग दैनिक व क वर्ग साप्ताहिक लघु वृत्तपत्रांना जाहिराती टाळले असल्याने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. राज्यभरातील विविध संघटनांनी त्यांचा निषेध केला असून सोशल मिडीयावर पोस्ट टाकत भावना व्यक्त केल्या आहेत.
शासनाच्या विशेष जाहीरातीचे कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, फक्त शासन मान्य जाहिरात यादी वरील दैनिक व साप्ताहिक लघु व छोट्या वृत्तपत्रांना डावलुन पुन्हा अन्याय केला आहे.
राज्य शासन दैनिक व साप्ताहिक लघु लहान वृत्तपत्रांना बंद पाडण्याचा बेतात असल्याचे दिसते. तत्काळ जाहीराती देऊन अन्याय दूर करावा, अन्यथा दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांना लघु संघटनेच्यावतीने शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकून मंत्रालय समोर आमरण उपोषणाला बससू, मागण्या मान्य करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अ‍ॅड. अकरमखान पठाण यांनी केले आहे. पुन्हा एकदा शासनमान्य दैनिक व साप्ताहिक लघु वृत्तपत्रांना महाराष्ट्र सरकारने जाहिरात मधून वगळले असून, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाची मध्यम दैनिकाला 1600 चौसेमीची जाहिरात आहे व लवकरच महाराष्ट्र सरकारचा अ दर्जाचे दैनिकला सरकारी योजनाचा जाहिरात सप्ताह सुरु होणार आहे, त्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणूक सारखे क वर्ग दैनिक व साप्ताहिक लघु वृत्तपत्रांना सर्व भाषीक वगळण्यात येणार असल्याची माहिती असल्याने मोठा आंदोलन करणे वेळेची आवश्यकता असल्याने यासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन शासनाच्या धोरणाला विरोध करणे आवश्यक आहे. याच संदर्भात अभयकुमार यादव यांनी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करत जाहिरात धोरणावर टिका केली आहे.