संस्कृत भाषा भारतीयांचा अनमोल ठेवा आहे म्हणून त्यांचे जतन करा – मेधा पाठे

12

जालना । प्रतिनिधी – संस्कृत भाषा ही अतिशय समृध्द भाषा आहे. प्राचीन काळी संस्कृत भाषा ही राष्ट्रीय भाषा होती. संस्कृत शिकल्याने मेंदू तल्लख होतो आणि स्मरणशक्ती वाढते म्हणूनच विदेशातील शाळांनमध्ये संस्कृत शिकणे अनिवार्य केले आहे. जर्मनील 14 विद्यापीठात संस्कृत शिकवले जाते संस्कृत भाषा ही आपल्याला नशिबाने मिळालेली असल्यामुळे भारतीयांचा अनमोल ठेवा आहे म्हणून त्यांचे जतन करा असे प्रतिपादन श्रीराम संस्कृत विद्यालय (पाठशाळा),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय,व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्ताने दिनांक -18/08/2024 रोजी आयोजित संस्कृत दिन व शालेय संस्कृत स्पर्धे परितोषिक वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक छत्रपती संभाजी नगर येथील संस्कृत भारतीच्या जिल्हा अध्यक्षा मेधा पाठे यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेशखर बालेकर तर प्रमुख पाहुणे जालना जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष ग्रंथमित्र डी.बी. देशपांडे, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या महासचिव शिल्पा शेलगांवकर,संस्कृत भाषा प्रचार समितीच्या उपाध्यक्षा जयश्री कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करणात आली.

मनोगत व्यक्त करतांत मेधा पाठे म्हणाल्या कि,परीश्रमामुळेच विद्यार्थ्यांचे भाग्य उदयास येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सतत परीश्रम केले पाहिजे विद्यार्थ्यांनी आपले गुरु, आई, वडील याबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त केले पाहिजे. ज्ञानाची तृष्ना, गुरुवरील निष्ठा, नेहमी अध्ययन राहण्याची वृत्ती, एकाग्रता आणि महत इच्छा हे पाच गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर शिक्षणात अडथळा येणार नाही. विद्यार्थ्यांनी आपण ग्रहण केलेली विद्या ही इतरांना सुध्दा द्यावी. विद्यार्थ्यांनी चांगले विचार, चांगले तत्व अंगिकारावे.

राजेशखर बालेकर मनोगत व्यक्त करतांत म्हणाले कि, संस्कृत भाषेच्या अध्यनाने विद्यार्थ्यांनचे उच्चार स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांनी कोणतीही भाषा शिकत असतांना ती चांगल्या प्रकारे शिकली पाहिजे. इंग्रजी ही राष्ट्रीय भाषा असली तरी घरांमध्ये विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा आली पाहिजे. भाषा,साहित्य,ग्रंथालय हे मनुष्याच्या बैध्दिक विकासाठी आवश्यक आहे पण त्याकडेच शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 23एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिवस आहे.राष्ट्रीय ग्रंथ दिवस म्हणून श्रीमद्भदगीतेचा स्विकार करण्यात यावा व भारत सरकारने श्रीमद्भदगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देऊन गीता जयंतीला जागतिक ग्रंथ दिवस हा श्रीमद्भदगीतेच्या नावे व्हावा यासाठी प्रयत्न करावे. यावेळी इयत्ता 1 ली व 10 वी मधील 275 विद्यार्थांनी संस्कृत स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यापैकी प्राविण्य प्राप्त 51 विद्यार्थांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी मनोहर कुलकर्णी, सचिन पाठे, कैलास बियाणी, नंदकुमार मुरगे, गजानन गोंदीकर, अनघा भावठाणकर, संदीप नेरकर, सुहास सदाव्रते, नितीन बावणे, प्रफल्ल देशपांडे, रेणुका गुलपेल्ली, प्रणव किनगांवकर, अनिकेत अंभोरे, अमोल कुंभलकर, सखाराम बोरुळ, प्रमोद बागडी, अमोल कुलकर्णी, संदीप नेरकर यासह विद्यार्थी,पालक,संस्कृत शिक्षक,वाचक वर्ग उपस्थित होता.