जयभीम सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटलांची भेट

12

विविध कामांचा दिला लेखाजोखा
जालना | प्रतिनिधी – बदनापूर विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून आज
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जयभिमसेनेचे सुधाकर निकाळजे यांनी
शिष्टमंडळासह भेट घेतली.
यावेळी सुधाकर निकाळजे यांनी केलेल्या 25 वर्षांपासूनच्या आंबेडकरी
चळवळीतील कामांचा लेखाजोखा आज मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे
सादर केला. उमेदवारी बाबत पुढील निर्णय लवकरच कळविण्यात येईल, असेही
देखील जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी जयभीम सेनेचे
राष्ट्रीय सचिव रोहिदास गंगातिवरे,नगरसेवक विजय कांबळे, जयभीम सेनेचे
युवक जिल्हा अध्यक्ष राहुल व्ही. खरात आदी पदाधिकार्यांची उपस्थिती
होती.