जालना । प्रतिनिधी – चित्रपटांतील अभिनेत्यांना स्वतःचे आयडॉल न मानता आपल्या आई -वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत स्वतः मधील उपजत गुणांना ओळखून उद्योग, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञानात करिअर घडवावे असा मौलिक सल्ला शिवसेना उपनेते ,माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज युवा पिढीस दिला.
तरुण फाउंडेशनच्या वतीने रविवारी ( ता .18) अहिर नवयुवक संघ नवनियुक्त पदाधिकार्यांचा तरुण टावर येथे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र जांगडे ,तरुण फाउंडेशनचे संस्थापक तरुण जांगडे ,किरण कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री खोतकर म्हणाले, तारुण्याचा बहुमूल्य वेळ स्वत:ला घडविण्यात खर्च करावा , संघटनेत मोठी शक्ती असून तरुण फाउंडेशन ला आपले नेहमी सहकार्य राहील अशी हमी खोतकर यांनी दिली.
तरूण जांगडे यांनी फाउंडेशन मार्फत आगामी काळात विविध सामाजिक, लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. किरण कोकाटे यांनी आभार मानले.
यावेळी अहिर नवयुवक संघाचे अध्यक्ष धनेश बरेटिये ( चौधरी), उपाध्यक्ष महेश कुटलियावाले, कार्याध्यक्ष अंकित गौरक्षक, सहकार्याध्यक्ष ललित देवावाले, महासचिव गौरव खाकीवाले, कोषाध्यक्ष हिमेश भगत, सचिव ध्रुव परिवाले, सहसचिव : सितेश भुरेवाल, रणवीर जटावाले, हर्ष बंकूवाले, तुषार भगत, अंश भुरेवाल, तुषार चौधरी ,सोहन गुरखुदे ,कृष्णा भुरेवाल, विशाल बटावाले, सदस्य : अक्षय गौरक्षक ,दुर्गेश भुरेवाल, महेश विजयसेनानी, राजेश देवावाले, युवराज भुरेवाल, जय खाकीवाले, प्रितेश विजयसेनानी, तुषार परिवाले, रोहित नारियलवाले, सोनू भुरेवाल, हर्ष चौधरी यांचा श्री खोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.