जालना – येथे मिटकॉन प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आज दि.14 ऑगस्ठ 2024 रोजी उद्योजकता विकास प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला आहे. या वेळी प्रशिक्षीका अरुणा कुलकर्णी,कांतीकराव दांडगे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, मिटकॉन व महीला प्रशिक्षणार्थीची उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री दांडगे म्हणाले की उद्योग उभारण्यासाठी व मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी महीलांनी स्वतः पुढाकार घेऊन जिद्द चिकाटी व मेहनतीने उद्योग यशस्वी केला पाहिजे. त्यासाठी या प्रशिक्षणात बारकावे समजून सांगितले.या प्रशिक्षणात सौर ऊर्जा , विद्युत वाहणे,सायबर सुरक्षा,बंदीस्त शेळीपालन,कुकूटपालन,दुग्ध व्यवसाय, जैविक खते, रेशीम उद्योग, दालमिल,विटा तयार करणे, मसाला उद्योग,गृह उद्योग, शेती पूरक व्यवसाय या सोबत उद्योग संधी मार्गदर्शन, उद्योग प्रेरणा, संघटन कौशल्य, उद्योजकीय गुणसंपदा,व्यक्तीमत्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, जागेची निवड, बाजारपेठ पाहनीतंत्र, शासकीय व निमशासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना,खादीग्राम उद्योगांच्या योजना, महामंडळाच्या विविध योजना, प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे, बँकेची कार्यप्रणाली , विक्री व्यवस्था,भांडवल उभारणी ,मनुष्यबळ , विमा संरक्षण, शासकीय परवाने या विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी
कांतीकराव दांडगे ,जिल्हा प्रकल्प अधिकारी मिटकॉन द्वारा पत्रकार भवन, जिल्हा ग्रंथालयाच्या बाजूला येथे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.