भोकरदन । प्रतिनिधी – संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य मिरणूक काढण्यात आली होती मिरवणुकीची सुरुवात फेडरेशन चे अध्यक्ष मोहन हीवरकर यांचे हस्ते नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थती आ संतोष दानवे पाटील,काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ चंद्रकांत दानवे भाजपचे शहर उपाध्यक्ष सुरेंद्र शेडुते,मनोज दुसाने,किशोर सराफ,निखिल वाढेकर,नवनाथ खरोटे,अमोल दुसाने,सुधीर, लकडे,दत्तात्रय सराफ,राजू बाविस्कर,राजू खूने,गणेश निकम,राम लोळगे, आदींची होती मिरवणुचे चे समारोप श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे ह.भ.प. रामेश्वर महाराज पवार (संस्थापक अध्यक्ष श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था, गौशाळा व अनाथालय,यांचे कीर्तन द्वारे करण्यात आले तसेच नव्याने रुजू झालेले भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांचे समाजाचे वतीने सत्कार करण्यात आले
दुपारी 1.00 वाजता.महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. ऑल इंडिया सोनार फेडरेशन भोकरदन तालुका व शहर सराफा असोसिएशन सुवर्णकार कारागिर संघटना,भोकरदन चे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सराफ यांनी केले तर आभार गणेश निकम यांनी मानले.