जालना । प्रतिनिधी – शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील हनुमान घाट, खांडसरी, लालबाग ,पावरलूम, परिसरातील आपल्या शेकडो समर्थ व कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, उपजिल्हाप्रमुख गणेश दादा सुपरकर, आत्मानंद भक्त, मेघराज चौधरी, महिला आघाडी च्या सौ सविता केवंडे, बाबुराव मामा जाधव, राजू पवार, दीपक वैद्य ,यांच्यासह अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते .
दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी हनुमान घाट येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व हा शिवसेना प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षात आपण प्रवेश केला ही आनंदाची बाब असून ,आपला पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल, शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. असे उद्गगार शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले
या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल संजय गायकवाड व समर्थकांचे उपस्थित आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कार्यक्रमाला उपस्थित महिलांचे अर्जुनरावजी खोतकर यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गायकवाड यांच्यासोबत गणेश साळुंके, शेख अख्तर दर्गावाले, सौरभ लवटे, विशाल इंगळे, दिलीप गुळवे, निलेश गायकवाड, विनोद जाधव, दिनेश टेकूर, सचिन डूरे, कचरू गायकवाड, दत्ता लखन गायकवाड, निलेश नवले, विकी पोगरे, अमोल पूर्वे, आकाश मोरे, अनिल बोंडे, गौरव जाधव, शुभम शिंदे, गणेश नन्नवरे, शंकर कटक, रोहित जाधव, गणेश जटाळे, ज्ञानेश्वर खवणे, गणेश हळनोर, प्रकाश शिंदे, अली शेख, सोमनाथ औरंगे, अजय गायकवाड, शुभम कटारे, सागर सुतार, विशाल लहाने, सागर डवले, गजानन नन्नवरे, विशाल कायंदे आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रभागातील सोनू साळवे, भरत पिंपळे, घोडे पाटील, कमलेश खरे, शिवा शेळके, गणेश राऊत, रमेश टेकूर, संतोष शिकारे, संजय काकडे, अंकित काळे, शिवा परळकर, दत्ता इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.