पक्ष फुटीनंतरही जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचीच मोठी ताकद – आ. परब

13

जालना । प्रतिनिधी – जालना शहरातील शिवसेना भवन येथे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर व भोकरदन या तिन विधानसभा मतदार संघांचा माजी मंत्री आमदार अनिल परब व राजू पेडणेकर यांनी आज 14 ऑगस्ट रोजी बैठक घेत पदाधिकार्यांशी थेट संपर्क साधून आढावा घेतला.
मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, माजी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उत्तमराव वानखेडे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, मुरलीधर शेजुळ, हनुमान धांडे, बाबुराव पवार, मनिष श्रीवास्तव, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, पुंडलिक मुठ्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
यावेळी पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलताना अनिल परब म्हणाले की, राज्यात शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर अनेक घडामोडी घडल्या अनेकांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केले. मात्र जालना जिल्ह्यात आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मजबूत फळी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद आहे. जालना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी पक्षाची चांगली बांधणी केल्यामुळे व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवल्यामुळे व सामान्य नागरिकांना सुखदुःखात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक पक्षाच्या पाठीशी आजही ठामपणे उभे आहेत. जालना जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यात यावे, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, बीएलए आदी सर्व पदाधिकार्यांच्या रिक्त पदावर नियुत्तया करून पक्ष संघटन आणखी बळकट करण्यात यावे.
जिल्ह्यात भगवा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवून शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. त्याचबरोबर नव्या दमाने सर्व शिवसैनिकांनी पुन्हा कामाला लागा असे सांगून पुढे म्हणाले की, एकीकडे प्रचंड ताकद सत्ता व पैसा असतानाही जालना जिल्ह्यातील शिवसैनिक अत्यंत निष्ठेने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी सभापती रमेशचंद्र धवलिया, जि.प. सदस्य बबनराव खरात, कैलास चव्हाण, गणेश डोळस, माजी सभापती मुरलीधर थेटे, भरत मदन, ताराचंद जाधव, अरुण डोळसे, शहर प्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, संघटक दीपक रणनवरे, विजय पवार, डॉ.राजेश राऊत, महिला जिल्हा संघटक मंगल मेटकर, गंगुताई वानखेडे, गणेश घुगे, जेके चव्हाण संदीप झारखंडे, युवा सेना शहरप्रमुख अंकुश पाचफुले, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, बाबुराव कायंदे, तालुका संघटक उद्धव भुतेकर, बाबुराव कायंदे, संजय रत्नपारखे यांच्यासह विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहरप्रमुख, आदी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.