मंठा | प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे.कार्यकर्त्यांना ‘मेरा बुथ सबसे मजबूत, मेरी पार्टी सबसे मजबूत’ हे उद्दिष्ट्ये ठेवून कार्य करण्याचा मंत्र दिला. ‘संघटना मजबूत करण्यासाठी माणसांना जोडणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने काम करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने काम करा. गोरगरीबांची सेवा करण्याची भावना ठेवा. स्वत:ची जबाबदारी लक्षात घेऊन संघटना बांधणीचे काम करा अशा सूचना आज महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना दिल्या.
दहिफळ खंदारे ता.मंठा येथील दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे उद्घाटन (किंमत १० लाख रुपये), वॉटर ग्रीड अंतर्गत ८४ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या भूमिपूजन, गावठाण अंतर्गत २ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे (किंमत ४ लक्ष रु) व प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना व रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांच्या कार्यारंभ आदेश वाटप, किर्ला ता. मंठा येथे ६८ हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण, गावठाण अंतर्गत १ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे (किंमत २ लक्ष रु) व प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना व रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांच्या कार्यारंभ आदेश वाटप सरहद्द वडगाव ता.मंठा येथे अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर (किंमत १० लाख रुपये), जिल्हा परिषद दलितवस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन (किंमत ४ लाख रुपये), मारुती मंदिर सभागृह लोकार्पण सोहळा, गावठाण अंतर्गत २ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे (किंमत ४ लक्ष रु) व प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना व रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांच्या कार्यारंभ आदेश वाटप आणी कोकरंबा ता.मंठा येथे आगमन व दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन (किंमत १० लक्ष रुपये), जिल्हा परिषद दलितवस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन (किंमत ४ लाख रुपये), गावठाण अंतर्गत २ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे (४ लक्ष रु) व प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना व रमाई आवास योजना अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलांच्या कार्यारंभ आदेश वाटप कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शिवाजी आबा खंदारे सतीशभाऊ निर्वळ गजानन देशमुख विठ्ठल मामा काळे दारासिंग चव्हाण गोविंद देशमुख रामेश्वर देशमुख विलास घोडके नितीन सरकटे रामकिसन बोडके आबासाहेब सरकटे भागवत पोटे राजेश मस्के शंकर बांडगे केशव खंदारे नवनाथ खंदारे दत्तराव कांगणे गजानन उरादखू नवनाथ चट्टे भगवान मास्तर सरकटे मधुकर सरकटे बबनदादा सरकटे रामेश्वर खंदारे रामेश्वर सरकटे कृष्णा खंदारे सिद्धेश्वर सरकटे सुधाकर सरकटे विष्णू राठोड केशवराव येऊल रवी पाटील भोलू गीते यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भाजपने कायम विकासाचे राजकारण केले. जातीचे राजकारण केले नाही. विकास करताना पक्षाकडून कधीही भेदभाव केला जात नाही. मतदारसंघात एकही महिला लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेपासून वंचित राहू नये. परतूर विधानसभा मतदारसंघात मंठा परतूर व जालना तालुक्यात सदरील योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तालुकास्तरीय आढावा बैठकी परतुर तहसील कार्यालय व मंठा तहसील कार्यालय येथे घेऊन तहसीलदार गटविकास अधिकारी ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतचे संगणक चालक यांना आपापल्या कार्यक्षेत्रात अतिशय जोमाने काम करण्याच्या सूचना आमदार लोणीकर यांनी दिले होत्या.
याकरिता मंठा परतूर आणि सेवली येथे महिला मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महिलांचे फॉर्म भरण्याची सुविधा निर्माण केली होती. त्या महिला मेळाव्यास परतूर येथे सुमारे सहा हजार महिला उपस्थित होत्या तर मंठा येथे सुमारे पाच हजार तर सेवली येथे एक हजार महिला उपस्थित होत्या. या तिन्ही महिला मेळाव्यात 12000 हून अधिक फॉर्म ऑनलाईन भरून घेण्यात आले होते. आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेले विशेष प्रयत्न यशस्वी झाले असून परतुर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बावन्न हजार पाचशे सहासष्ट अर्ज मंजूर करण्यात आले आहे. मंठा तालुक्यातील चोवीस हजार पाचशे पंच्यानौ तर परतूर तालुक्यातील सत्तावीस हजार नऊशे एकाहत्तर अर्जाचा यात समावेश आहे.