जालना – भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल मोरेश्वर सावे यांच्या हस्ते गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या प्रसंगी सर्वांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.