जालना – राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत महा मॅरेथॉन -2024 एक धाव सुरक्षेची या 2 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि मेडल देवून गौरव केला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, क्रीडा संघटक पी.जे.चाँद, विज गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम नितीन दिलीप पवार तर द्वितीय आकाश रामेश्वर राठोड आणि तृतीय क्रमांक मोहित चरणसिंग मेहेर यांनी पटकाविला. मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम गिता रामेश्वर राठोड तर द्वितीय अंजली दत्ता लघुखरे आणि तृतीय क्रमांक प्रिती समाधान शिंदे यांनी पटकाविला आहे.