जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही जागा लढवणार नामधारी सेक्युलर राजकीय पक्षाला जनता कंटाळली; येणारा काळ एमआयएमचा – शेख माजेद

11

जालना । प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून,सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. त्याचप्रमाणे एमआयएम पक्षाने ही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्याच अनुषंगाने आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार ब्यारिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयएम जिल्हा कार्यालयावर जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाच ही विधानसाभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, पक्षाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभेचे सर्वे करण्यात आले असून लवकरच इच्छुक उमेदवारांची मुलाखात घेण्यात येतील, जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या अथक प्रयत्नां मुळेच आज जिल्ह्यात एम आय एम पक्ष हा बळकट झालेला दिसून येत आहे, सर्वसामान्य लोकांचे विषय शेख माजेद यांनी आक्रमक पने प्रशासना समोर ठेऊन कामे करून घेतलेली आहेत, सर्वांना सोबत घेऊन त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे जनते प्रयत्न पोचवण्याचा उत्तम कार्य केलेले आहे, यामुळेच जिल्ह्यातील तमाम पदाधिकार्‍यांनी एक मतात ठरविले की एमआयएम पक्ष जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढविणार असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. येणारा काळ हा आपला असून कार्यकर्त्यांनी कामाला आजपासूनच लागावे असे शेख माजेद यांनी म्हटले आहे.तर पाचही विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून तालुक्यातील पदाधिकार्‍यांशी किंवा जिल्हाकार्यालाय येथे संपर्क साधावा असेही ते म्हणाले.

जिद्द अन् चिकाटीने शेख माजेद यांनी मेहनत घेतली – एजाज शेख
जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी जिल्ह्यासह जालना विधानसभा मध्ये खूप जिद्दीने व चिकाटीने मेहेनत केलेली आहे, पक्षासह इतर संघटना सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, मागील पाच वर्षां पासून ते सतत जनतेच्या सोबत राहून त्यांचे प्रश्न मार्गी लावतांना दिसून येत आहे, यामुळेच जालन्यातील जनता यावेळेस शेख माजेद यांना आमदार केल्या शिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष एजाज शेख यांनी दिली.

मागील पाच वर्षात जनतेची कामे केली – जोहेब अन्सारी
2019 च्या मागील विधानसभा निवडणुकीत शेख माजेद यांची प्रबळ दावेदारी होती, परंतु पक्षाचे आदेश मान्य करत जो उमेदवार पक्षाने घोषित केले होता. त्यांचा तन मन धनाने आम्ही काम केले, प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती, मागील पाच वर्षां पासून आम्ही जनतेची कामे करत आहोत, जनता आमच्या पाठीशी आहे, अता समाजाच्या लोकांच्या समर्थनामुळे त्यांच्या आग्रहाखातर शेख माजेद यांनी जालना विधानसभा निवडणूक लढावी ही आमच्या सर्वांची इच्छा असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष जोहेब अन्सारी यांनी दिली.

जालना विधानसभा शेख माजेद यांनी लढवावी – हाफिज जावेद खान
आगामी जालना विधानसभा निवडणूक जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी लढावी असा ठराव जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी एकमताने मंजुर करण्यात आला असून लवकरच आम्ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची भेट घेऊन उमेदवारी घोषित करण्याची मागणी करणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष हाफिज जावेद खान यांनी सांगितले आहे.