अंतरवाला येथे इसमाचा मृत्यू अपघात नसुन खुन; तालूका पोलीस ठाण्याचे पो.निरि.सुरेश उनवने यांची माहीती

82

जालना । प्रतिनिधी – जालन्यातील अंतरवाला येथे योगेश गोवर्धन मोरे राहणार गोलापांगरी या इसमाचा मृतदेह काल रविवारी रोडवर आढलून आला होता या प्रकरणी पोलिसांना प्रथम हा अपघात असल्याचे भासले या वेळी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले होते या वेळी या मयताच्या डोक्यात दोन्ही साईडला मार लागल्याचे डॉक्टरांच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले यावरून पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून यात हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांना आढळून आले. तालुका पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरील आरोपी अंबड मध्ये आहे यावरून आज दि.12 सोमवारी चार वा.च्या सुमारास पोलीसांनी संशयित आरोपी 1) अमोल खडके, 2) संदीप सदाशिव गायकवाड, राहणार बोरी या दोगाला अंबड इथून ताब्यात घेतले आहे व त्याच्यासोबत जे पण त्याला या गुन्ह्यात सहकार्य करणारी आहे त्यांचा सुद्धा शोध सुरू असून लवकरच त्यांना सुद्धा अटक केली जाणार असल्याची माहिती तालूका जालना पोलीस ठाण्याचे पो.निरि. ऊनवणे यांनी आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दिली आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, पोह.आटोळे, पोह. केवट आणि गोपणिय शाखेचे सुनिल गांगे यांनी केली आहे