जालना | प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी ह्रदयसम्राट राज ठाकरे शुक्रवारी10ऑगस्ट रोजी जालना दौरा करणार आहेत सध्या विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे.जालना येथील शासकीय विश्रामगृहात मनसे पदाधिकारी गाठीभेटी व विधानसभा निहाय बैठक असून इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जाफ्राबाद तालुका सचिव पंढरीनाथ म्हस्के यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.मनसेने देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे.मनसेच्या कार्यकर्त्यापासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पर्यंत सगळ्यांनी तयारी सुरू केली आहे.या अनुषंगाने राज ठाकरे मराठवाडा दौरा करत आहेत जालना मध्ये राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती मनसे तर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.*मनसेच्या भूमीकडे लक्ष-* यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी माहिती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मात्र राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे ’एकला चलो रे’ चा नारा दिला. कारण 225 ते 250जागा मनसे लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. त्याच भाग म्हणून राज ठाकरे 10 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यात येऊन कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत