जालना । उपेक्षित, वंचितांचा बुलंद आवाज असलेल्या येथील विद्रोही पॅंथर सामाजिक विकास संघटनेचा दुसरा वर्धापन दिन शुक्रवारी( ता. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापनदिन निमित्त आयोजित मेळाव्याचे उदघाटन आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी शिवसेना ( ठाकरे गट) जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर हे होते. या वेळी प्रवक्ते दादासाहेब शेळके, दिलीप खरात, अण्णासाहेब चित्तेकर, बाला परदेशी, शेख माजेद, सौ. सविता ताई मुंढे, विजय लहाने, मनोज कोलते, राजेश राऊत, महेंद्र रत्नपारखे, दीपक दांडगे संघटनेचे संस्थापक सचिव पँथर संदीप साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. कैलास गोरंट्याल यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात भास्करराव आंबेकर यांनी महामानवांच्या पुरोगामी विचारांवर कार्यरत विद्रोही पॅंथरने उपेक्षित, वंचित घटकांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून मिळवून दिलेला न्याय ही सामाजिक बांधिलकी,तसेच महामानवांचे विचारच आजच्या तरुणांनी आत्मसात करावे असे सांगितले. दादासाहेब शेळके यांनी “संविधान बचाव” या विषयावर विद्रोही शैलीत परखड प्रबोधन केले . प्रास्ताविकात संदीप साबळे यांनी संघटनेमार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राहुल उघडे यांनी संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. मराठवाडा अध्यक्ष राहुल खरात यांनी मनोगत व्यक्त केले.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी रवी जाधव, विशाल तेझाड, माधव जाधव, मिलिंद खरात विनोद लहाने, अरुण काजळे, बन्सी गवई,सुनील झोरे, आकाश जाधव, आनंद म्हस्के, किरण गंगातिवरे, अजय सुतार, जीवन दांडगे, लखन चितेकर, विशाल खंडागळे, श्याम नवगिरे, गौतम तुपे, योगेश बोर्डे, आकाश खरात, नितीन दांडगे, आकाश लहाने आदींनी परिश्रम घेतले.