जालना । प्रतिनिधी – तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते मा.श्री.अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी गावातील सिमेंट रस्त्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले. सिंधी काळेगावसह मतदार संघातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली प्राथमिकता असल्याचेही, ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. पक्षप्रवेश केलेला तरुणांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या विचारांवर निष्ठा ठेवून समाजातील गरजू व नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित व्हावे, असे संबोधित करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सय्यद नजर माजी उपसरपंच, सय्यद सरदार, भागवत गिराम ग्रामपंचायत सदस्य सय्यद, अहमद, संजय गिराम, सय्यद शफी, अविनाश जोगदंड, सर्जेराव खर्जुले, मदन राऊत, जगन गोरे, दीपक पवार, माजीद शेख, गजानन गोरे ,सचिन खर्जुले, गोवर्धन गिराम, आयुब शेख, प्रदीप मोरे, धम्मपाल जोगदंड, कमलाकर जोगदंड, सोहेल शेख, बळीराम मगर, राजाळे मामा, संजय जोगदंड वाघमारे भाऊसाहेब ,शाहरुख दुरानी अन्सार शेख आदींनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे अर्जुनरावजी खोतकर यांनी स्वागत केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, तालुकाप्रमुख भगवानराव अंभोरे ,जालना बाजार समितीचे संचालक तुकारामजी खर्जुले, युवा सेनेचे एसराज खोतकर ,प्रमोद वाघमारे, नागेश डवले, सलमान कुरेशी, आयोजक भागवत गिराम,डॉ. पठाण नजीरभाई, भाऊसाहेब शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.