प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले मराठवाड्याच्या दौऱ्यावर ; सोमवारी जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संयुक्त आढावा बैठक

11
जालना | प्रतिनीधी – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सज्ज झाली असून १० ऑगस्ट पासून मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या जिल्हा निहाय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दि.१२ आगस्ट २०२४ सोमवार रोजी छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्ह्यांची संयुक्त आढावा बैठक जिमखाना क्लब जालना रोड छत्रपती संभाजी नगर येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथाला, प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विधीमंडळ काँगेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अ.भा.काँगेसचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजीमंत्री नसीम खान, माजीमंत्री आ.अमित देशमुख हे दोन्ही जिल्ह्यातील काँगेस नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणूकीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत जालना जिल्हा प्रभारी माजी आ.नामदेवराव पवार, खासदार डॉ कल्याणराव काळे, आ.कैलास गोरटंयाल, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, तसेच माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस जालना जिल्ह्यातील काँगेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आघाडी व सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष माजी जि.प, प.स, न.प सदस्य आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहर जिल्हा काँगेसचे अध्यक्ष शेख महेमूद, वरीष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, शहर ब्लॉक काँगेसचे अध्यक्ष वैभव उगले, न.प.चे माजी गटनेते गणेश राऊत आदींनी केले आहेत.