पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 05 तलवारी केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

47

जालना । प्रतिनिधी – शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोडवर असून पोस्टामार्फत आलेल्या पाच तलवारी पोलीसांनी जप्त केल्या असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. अजय कुमार बंसल यांनी अवैध शस्त्रे बाळगणार्‍या आरोपींची माहिती घेऊन शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणार्‍या आरोपींची माहीती घेऊन शोध घेत असतांना खबर्‍यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरात इसम मयुर नंदकिशोर मेंढरे याने दिनांक 19/07/2024 रोजी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविलेल्या आहेत. त्यानुसार मयुर नंदकिशोर मेंढरे, वय-21 वर्ष, रा. खडकपुरा, जालना याचा शोध घेवुन त्याकडे तलवारीबाबत विचारणा केली असता त्याने दिनांक 19/07/2024 रोजी मुख्य पोस्ट ऑफीस, जालना येथुन तलवारीचे पार्सल त्याचा मित्र अविनाश सुरज चौधरी, वय-26 वर्ष, रा. खडकपुरा, बरवार गल्ली, जालना याच्या मदतीने घेतले असल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन अंदाजे रु.15000/- किंमतीच्या पाच तलवारी जप्त करुन सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, सतिष श्रीवास, आक्रूर धांडगे, दत्ता वाघुंडे, संदीप चिंचोले यांनी केलेली आहे.