लॉयन्सतर्फे पंचमुखी महादेव मंदिरात महाआरती व भक्तांना फराळ वाटप

7

जालना । प्रतिनिधी – लॉन्स क्लब ऑफ जालनातर्फे श्रावण मासानिमित्त येथील श्री पंचमुखी महादेव मंदिरात महाआरती करण्यात येऊन माजी प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, सामाजिक कार्यकर्ते रवी गोवर्धन अग्रवाल, रोटरियन शरद गांधी यांच्याहस्ते भक्तांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रकल्प प्रमुख द्वारकादास मुदंडा, वंदना मुंदडा, जगत घुगे, कुसुम घुगे, दिनेश चांडक, वंदना चांडक, क्लबच्या अध्यक्षा जयश्री लढ्ढा, सचिव मंजु श्रीमाली, कोषाध्यक्ष कल्पना बियाणी यांची उपस्थिती होती.