परतूर | प्रतिनिधी – परतूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास दीडशे च्या वर गावांमध्ये पावसाळ्यामध्ये बैलगाडी जात नव्हती, मात्र आपण मंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील 300 गावांना डांबरीकरणाच्या रस्त्याने जोडले असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते परतुर तालुक्यातील वलखेड येथे कंडारी वलखेड परतुर डांबरीकरण रस्ता व पुलाचे बांधकाम करणे (07 कोटी रु),39000 लिटर क्षमतेच्या जल कुंभाचे बांधकाम करणे तर पाटोदा येथे गणपती मंदिर ते बस स्टँड सिमेंट रस्ता बांधकाम करणे, गणपती मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम करणे, ऐतिहासिक बार व दुरुस्ती करणे, दलित वस्ती अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे, धनगर वस्ती अंतर्गत सभा मंडप बांधकाम करणे 01 कोटी रु अशा एकूण आठ कोटी रुपये किमतीच्या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण वॉटर ग्रीन योजना कार्यान्वित केली मात्र, अधिकाऱ्यांनी कुठल्या गावात पाण्याचे टाकी आहे किंवा नाही याची शहानिशा केली नाही जिल्हा परिषदेत कडून यादी घेऊन प्रत्येक गावात पाणी टाकी असल्याचे कागदपत्रि दाखवून दिले, मात्र प्रत्यक्षात अतिशय पुरातन जुना झालेल्या पडलेल्या सांगाडा उरलेल्या पाण्याच्या टाक्या या वॉटर ग्रीन साठी उपयुक्त नव्हत्या त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेत मतदार संघातील 120 गावांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत 120 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून सध्या मतदारसंघातील जवळपास 30 गावांमध्ये पाणी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे ते त्या दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या एका वर्षभरामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचा ग्रामविकास खात्याचा निधी असो की अर्थसंकल्पातील रस्ते असो, किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते असतील या सर्व कामांसाठी आपण स्वतः पुढाकार घेत निधी प्राप्त केला असून केंद्र सरकार नाबार्ड जागतिक बँकेच्या माध्यमातूनही मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे आपण मतदार संघात आणली आहेत असेही ते म्हणाले
आपण संपूर्ण आयुष्यात कधी खोटे नारळ फोडलेले नसून ज्या ज्या ठिकाणी आपण नारळ वाढवले त्या त्या ठिकाणी विकास काम करून दाखवले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदार संघाचा चौफेर विकास करत असताना मतदारसंघातील सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांसाठी 200 च्या वर गावांमध्ये विविध माध्यमातून सभामंडपाचे बांधकाम आपण केले असून गावागावातील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमासाठी समाज एकत्र करण्यासाठी निवारा उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये परतूर शहरांमध्ये 2000 घरकुल तर परतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 7000 हजार घरकुल असे नऊ हजार घरकुले सर्वसामान्य कुटुंबा साठी प्रयत्नपूर्वक पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना अहिल्यादेवी होळकर आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आधी माध्यमातून उपलब्ध करून दिली असल्याची यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की परतुर तालुक्यामधील 7000 विधवा वयोवृद्ध, दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मानधन सुरू करण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
गेल्या 35 वर्षापासून राजकारण करत असताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलो असून येणाऱ्या काळात आपण याच पद्धतीने समाज विकासासाठी काम करणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले, सामाजिक घटकांचा विकास करत असताना जात धर्म पंथ या सर्व गोष्टी बाजूला ठेवत आपण सर्वसामान्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आलो असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे, जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर, रंगनाथ येवले रवींद्र सोळंके नितीन जोगदंड प्रभाकर खंदारे, पुंडलिकराव डव्हारे विश्वनाथ सुरूंग,आसाराम सुरूंग, सखाराम सुरुंग तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर सुरुंग तुळशीदास खवल, लक्ष्मण शिंदे गणेश राव खवल रामकिसन आर्दड संभाजी शिंदे आत्माराम खवल, बबनराव खवल श्री गिरी माजी सरपंच वेढे दत्ताराव सुरुंग लक्ष्मण बील्हारे गजानन वाटाणे भागवत महाराज डव्हारे तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, अभियंता श्री सग्रोळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती