परतूर शहरात फायबरचे गतिरोधक बसविण्यास प्रारंभ

11

परतूर । प्रतिनिधी – परतुर शहरांमध्ये जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून आणलेल्या विशेष निधीतून परतूर शहरात फायबरचे स्पिड ब्रेकर (गतिरोधक ) रेडियम सहित बसविण्याचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. परतुर शहरात गतिरोधक नसल्यामुळे अनेक वेळा अपघात झाले अनेक लोकांना जीव गमवावा लागला अनेकांना कायम अपंगत्व आलं या सर्व गोष्टीची जाण लक्षात घेता जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी तात्काळ परतुर शहरांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य रस्त्यावर व त्यानंतर अंतर्गत शहरातील रस्त्यांवर फायबरचे गतिरोधक रेडियम सहित बसविण्यास सुरुवात केलेली आहे त्याबद्दल जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांना नागरिकांनी धन्यवाद दिले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे,सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले, तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, व्ही जी एन टी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव तरवटे, नितीन जोशी ,तेजस अग्रवाल, रितेश अग्रवाल, अनिलशेठ अग्रवाल, ईघारे, सेफ सय्यद, युवासेना शहर प्रमुख प्रणय मोर, कैलास पुरी, व कैलास चव्हाणसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात यांची उपस्थिती होती.