जालना | प्रतिनिधी – जालना महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शहर महास्वच्छता अभियानात लॉयन्स क्लबनेही सक्रिय सहभाग नोंदविला असून, अंतर्गत बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेच्या माध्यमातून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांना प्रतिबंधासाठी कीटनाशकाची फवारणी करण्यात आली.
स्वच्छ जालना ह्या संकल्पनेतून सकाळी अग्रसेन चौक ते प्रियदर्शनी कॉलनी, माणिकरनगर व संभाजीनगर या परिसरात फवारणी मोहीम राबवण्यात आली. सात दिवस शहरातील विविध भागात अशी फवारणी करण्यात येणार आहे. कीटनाशक औषधांची पुरवठा योगेश पटवारी यांनी केला आहे.
या उपक्रमात लॉयन्स क्लबच्या जयश्री लढ्ढा, मंजु श्रीमाली, कल्पना बियाणी, प्रकल्प प्रमुख रोटेरीच्या वर्षा पीत्ती, अतुल लढ्ढा, राजेश लुणीया, बळीराम बेन्द्रे, गणेश सरोदे आणि इतर लायन्स क्लब सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. लॉयन्स क्लब जालनाच्या या प्रयत्नामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होईल, असा विश्वास जयश्री लड्डा यांनी व्यक्त केला.