जालना – जिल्हा काँगेस अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आज आमदार केलाश गोरंट्याल यांच्या हस्ते त्यांचे निवासस्थानी जालना येथे सत्कार करण्यात आले तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिली।
जालना जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अब्दुल रफीक अ. रशीद यांनी प्रदेश अध्यक्ष कॉग्रेस अल्पसंख्यक विभाग वजाहत मिर्जा साहब यांच्चा आदेशाचे जिल्हयातील विविध तालुका व ग्रामीण भागात नियुक्त्या करण्यात आली आहे, जिल्हा उपाध्यक पदी डॉ. नसीम अहेमद, व शेख रिजवान यांची नियुक्ती केली तसेच घनसावंगी तालुका अध्यक्ष पदी पटेल खलील खान रहेमान खान, अंबड तालुका अध्यक्षपदी सय्यद जावेद नवाब. तर अंबड शहर अध्यक्ष पदी जावेद सौदागर, परतुर तालुका अध्यक पदीं बरेखानी आसेफ जमीनदार, शहर अध्यक्ष पदी एजाज मुसा तंबोली, बदनापुरहून शेख असलम यांची पुन्हा त्याचपदी नियुक्ती दिली।
सदर कार्यक्रमास आमदार कैलाश गोरंट्याल यांनी काँग्रेस अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांना पुष्हार घालून अभिनंदन केले, यावेळी काँगेस प्रदेश सरचिटणीस अॅड. रामकुन्हाडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राम सावंत, जिल्हा अध्यक्ष SC सेल श्री. दिनकर घेवेंदे काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रकांत स्नपारखे, यावेळी उपस्थित होते।