जालना – विविध आपत्ती संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने बुधवार, दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता जालना शहरातील मंठा चौफुली येथून मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
राज्यात उदभवणाऱ्या विविध आपत्तीत कोणती दक्षता घ्यावी याबाबत जनजागृतीसाठी महसूल व वन विभागाने शासन निर्णयान्वय मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने जालना शहरात 7 ऑगस्ट रोजी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजना, आपदा मित्र, होमगार्ड व स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.