महायुती जिल्ह्यातील पाचही जागा जिंकणार – माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे..

17

जालना | प्रतिनिधी – भाजपा जिल्हा जालना ची (विस्तारित कार्यकारिणी बैठक) महा अधिवेशन हे  भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10. वाजता मुक्तेश्वर लॉन्स,कचेरी रोड,जुना जालना संपन्न झाले.

यावेळी आ.संतोष पाटील दानवे,आ.नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, रामेश्वर पाटील भांदरगे, राजेश राऊत, जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर,सतिष घाटगे, एजाज भाई देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, देवदिास कुचे, अतिक खान, सुनिल आर्दड, अर्जुन गेही, सोपान पेंढारकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, देविदास देशमुख, पांडूरंग पोहेकर, बाबुराव मामा खरात, वसंतराव जगताप, सुहास मुंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, वसंतराव शिंदे, गणेश ठाले, ज्ञानेश्वर भागिले, भगवान मात्रे, प्रदीप पवार, विजय कामड, माजी सभापती राजेश चव्हाण, डॉ.अमोल कारंजेकर, जिल्हा चिटणीस स्नेहा जोशी, सुरेश दिवटे, डॉ.तुकाराम कळकुंबे,सुधाकर खरात,रोषण चौधरी, नगरसेवक महेश निकम,सुनिल पवार,चंपालाल भगत, प्रदीप साबळे, सत्यनारायण गिल्डा, कैलास उबाळे आदीची प्रमुख उपस्थीती होती.

माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 चा पराभव विसरा व येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अंग झटकून कामाला लागा व विरोधकांचे फेक नरेटीव्ह खोडून काडून आपल्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी जनतेच्या उपयोगासाठी केलेल्या सोयीसुविधा सवलती जन कल्याणकारी योजना घरोघरी जनतेपर्यंत जाऊन सांगा व पुन्हा एकदा जिल्ह्यातील पाच ही जागा महायुतीच्या पारड्यात येण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा करून विजयश्री खेचून आणा, आम्ही ज्यावेळेस भाजपाचे काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी कधी असे वाटले नाही की देशभरात राज्यात आमची सत्ता येईल पण लोकांचे कामे करत गेलो पहिल्यांदा सभापती दोन वेळेस आमदार पाच वेळेस खासदार तीन वेळेस केंद्रात मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष याच जनतेच्या आशीर्वादाने झालो त्यामुळे 2024 लोकसभेला पराभूत झाल्यानंतरही हाताश न होता दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या दरबारात दाखल झालो कार्यकर्त्यांना धीर दिला व पुन्हा कामाला लागलो महाराष्ट्रभर जिल्हाभर दौरे केले व येणाऱ्या विधानसभेच्या कामासाठी जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष यांना निवडून द्यावे यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असे प्रतिपदान जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 2000 पेक्षा जास्त जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या समोर अधिवेशनात बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, आज या जिल्हा अधिवेशनात भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे तरुण तडफदार आमदार यांनी महाराष्ट्र व देशातील राजकीय परिस्थिती कार्यकर्त्यांच्या समोर मांडली विरोधकांनी कशाप्रकारे फेक नरेटीव्ह चालवून जनतेची दिशाभूल केली व जनतेला फसवले व मतदान आपल्या पदरात पडून घेतले आज जनतेला कळून चुकले आहे की चूक झाली आहे फसवल्या गेलो आहोत माणूस एकदाच फसू शकतो दुसऱ्यांदा नाही म्हणून परभावाने खचून न जाता भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जावे व आपल्या केंद्र सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी यांनी व महाराष्ट्रातील आपल्या युतीच्या सरकारने जनतेची केलेली कामे सांगणारा राजकीय ठराव मांडला ज्याला सर्व उपस्थितांनी हात उंचावून अनुमोदन दिले.

बदनापूरचे सन्माननीय आ.नारायण भाऊ कुचे यांनी आज भाजपाच्या जिल्हा अधिवेशनात राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी देशासमोर मांडलेल्या जनहिताच्या अर्थसंकल्प व त्यातून महाराष्ट्राला मिळालेला निधी व योजना सर्व सभागृहाला सांगितले.

जालना विधानसभा प्रमुख जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी बुथनियोजन व नवमतदार नोंदणी याची माहीती सांगुन जालना विधानसभेचा आढावा व भाजपा ची तयारी याची माहीती सभागृहाला दिली…त्यावेळी संपुर्ण सभागृहाने जालना विधानसभा भाजपाला सोडवून घेण्याची मागणी करत मा. भास्कर आबा पाटील दानवे यांच्यासाठी उमेदवारी पक्षाकडे मागितली.

घनसावंगी विधानसभा प्रमुख श्री.सतीश घाडगे यांनी यावेळी घनसावंगी मतदार संघा चा आढावा मांडला व येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपा सज्ज असून पक्ष नेतृत्वाने घनसावंगीतून कोणत्याही कार्यकर्त्यास उमेदवारी दिली तर सर्वजण हिरीरीने प्रयत्न करून  विजयश्री खेचून आणू.

यावेळी श्री सुनील आर्दड यांचे समायोजित भाषण झाले श्री अशोक अण्णा पंगारकर यांनी शोक प्रस्ताव मांडला श्री बद्रीनाथ पठाडे भाजपा जिल्हाध्यक्ष जालना यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करणारे प्रस्ताविक केले यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेशाकडून विशेष उपस्थित असलेले जालना लोकसभा प्रभारी इजाज भाई देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्रात भाजपा चा बालेकिल्ला हा जालना जिल्हा असून सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनी पक्षाच्या विजयासाठी काम करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धिविनायक मुळे यांनी केले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या देठे यांनी 50% असलेल्या मातृशक्तीमध्ये महिला मोर्चाचे काम व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरोघर संपर्क साधून शासनाने आणलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना समजावून सांगून महिलांना भाजपाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले तसेच जालना महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सौ शुभांगी देशपांडे यांनी देखील जालना महानगराच्या प्रत्येक प्रभागात भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या महिलांसाठीच्या व मुलींसाठीच्या योजना समजावून सांगून भाजपाचा जनाधार वाढविण्यासाठी महिला भगिनींनी काम करावे असे आव्हान केले सौ शुभांगी देशपांडे यांनी वंदे मातरम व वैयक्तिक गीत सांगितले कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम महाराष्ट्र गीत याने झाली व अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

यावेळी सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा सौ.दिपालीताई बिनीवाले, सौ.शुंभागीताई देशपांडे, वैद्यकिय सेल जिल्हाध्यक्ष श्रीमंत मिसाळ, डॉ.रमेश शाहणे, प्रभुलाल गोमतीवाले, शितल प्रसाद पांडे, दुर्गेश कुरील,सुनिल खरे, राजु साळवे,संतोष पवार, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सले, मधुकर गाढे, शिवराज जाधव, कृष्णा खिल्लारे, सांडू वाघ,नामदेव तिडके, बबनराव सिरसाठ, किसन शिंदे, जगन्नाथ बारगाजे, संजय डोंगरे, प्रा.राजेंद्र भोसले,सौ.ममता कोंडयाल, सिध्देश्वर हसबे,डोंगरसिंग साबळे, रामेश्वर सोनवणे, कैलास सोळुंके, रामेश्वर पडोळ, आनंद झारखंडे, कृष्णा गायके, सुमित सरडकर, अमोल धानुरे, मनोज पाचफुले,उध्दव दुनगहू, प्रदीप देठे, नेमीचंद भुरेवाल,पद्माकर जऱ्हाड, योगेश शिंमगे, रवि कायंदे,संदीप खरात, मुकूंद मुंढे,नारायण जाधव,दत्ता जाधव,नामदेव नागवे, राजु गवई, महेश मुळे, अभिजीत अंभोरे, संदीप काटे, नानासाहेब देव्हडे, बद्रीनाथ वाघ, उध्दव ढवळे, सागर वाहुळकर, परिक्षीत शिंदे,संतोष मोरे,सतिष केरकर,ओम कळकुंबे,किशोर पाखरे, संतोष खंडेलवाल, सय्यद इम्रान, अकबर परसुवाले, रंण्जीत रिडला यांच्यासह भाजपाची सर्व जिल्हा कार्यकारणी सर्व आघाड्या सर्व मोर्चे सर्व तालुकाध्यक्ष महिला मोर्चा असे एकूण 2000 पेक्षा जास्त कार्यकर्ते श्री मुक्तेश्वर लॉन्स कचेरी रोड जालना येथे चाललेल्या जिल्हा अधिवेशनात उपस्थित होते .