मुंबई | प्रतिनिधी – 173 गाव वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत 101 गावात पाणी गेले असून बाकी 72 गावात अद्याप पाणी पोहोचली नाही. या 72 गावातील काही ग्रामपंचायतींनी सरपंचांनी पाणी घेण्यास नकार दिला आहे. मुख्य जल कुंभापासून गावातील वितरण जलकुंभापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरण ची आहे. गावातील जलकुंबात पोहोचलेले पाणी गावातील घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मुख्य जल कुंभा पासून गावातील जलकुंभा पर्यंत पाणी पोहोचविण्याकरिता हायड्रोलिक टेस्ट होणे गरजेचे आहे. राहिलेल्या 72 गावात भविष्यात दुष्काळ पडला तर पाणीटंचाई जाणू शकते त्यामुळे गावागावात पाईपलाईनच्या असलेल्या किरकोळ दुरुस्त्या करून पाणी देण्याची व्यवस्था जीवन प्राधिकरणाने केली पाहिजे अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या ते मुंबई येथे आयोजित जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव यांच्या कार्यालयात वॉटर ग्रीड योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. या आढावा बैठकीस जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उपअभियंता आणि सदरील योजनेचे गुत्तेदार उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मंठा 95 गाव वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेत सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन 120 कोटी रुपये ची मंजुरी आपण आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून या योजनेत 120 जल कुंभाचा समावेश असून त्यापैकी फक्त 26 जलकुंभ पूर्ण झाले असून उर्वरित जलकुंभ बांधण्याचे काम अतिशय कासव गतीने चालू असून अतिशय वेगाने राहिलेले जलकुंभ बांधण्याच्या सूचना या बैठकीत आमदार लोणीकरांनी दिल्या. मंठा तालुक्यात रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या नवीन रस्त्यामूळे पाच किलोमीटर परिसरातील पाईपलाईन मोठ्या प्रमाणावर दबल्याने मंठा तालुक्यातील 95 गावे वाटर ग्रिड योजनेत ढोकसाळ परिसरात 27 गावात सुटले नसून नायगाव तळणी परिसरातील सातशे मीटर मोठ्या व्यासाची पाईपलाईन अपूर्ण असल्यामुळे चाळीसगावात पाणी अद्याप पोहोचले नसून 95 गाव वॉटर ग्रीड योजनेतील 67 गावात पाणी अद्याप पोहोचले नाही याकरिता पाईपलाईन होण्याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यता होणे गरजेचे आहे अशा सूचना आमदार बबनराव लोणीकर यांनी करताच जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिवांनी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना संबंधित गुत्तेदाराकडून लेखी पत्राद्वारे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.