जालन्यात मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणारी टोळी गजाआड… मौजपुरी पोलिसांची कारवाई

35

जालना । प्रतिनिधी – जालन्यासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जिओ व एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरमधील बॅटर्‍या चोरी करणार्‍या टोळीचा
मौजपुरी पोलीसांनी मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई आज 6 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासुन जिओ व एअरटेल कंपनीच्या दुरसंचार मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरीचे गुन्हे घडल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना आप-आपले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रभावी रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशीत करुन विशेष पोलीस ठाणे हद्दीतील दुरसंचार मोबाईल टॉवरचे ठिकाणे लक्ष देऊन चेक करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने 31 जुलै रोजी रात्रगस्तावरील अंमलदार सहायक फौजदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार शैलेंद्र आडेकर व धोंडीराम वाघमारे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना जालना ते मंठा हायवे रोडलगत सोलगव्हाण पाटीजवळील धानोरा शेत शिवार अंतर्गत येणार्या शेतात असलेल्या एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवर जवळ काही आरोपींच्या संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी पोलीस अंमलदार वाघमारे यांनी टॉर्चचा उजेड त्यांचे दिशेने मारला असता ते चोरटे त्यांच्या वाहनात बसुन तेथुन पळाले. पोलीसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी पेट्रोलींग वाहन संशयीत ईरटीगा वाहनाच्या दिशेने नेले असता संशयीतांनी त्यांच्या ताब्यातील ईरटीगा गाडी जालन्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळविली. त्यामुळे रात्रगस्त ड्युटीवरील अंमलदारांनी त्यांचे वाहनाचा पाठलाग करुन उटवद येथील पेट्रोलपंपासमोर संशयीत आरोपींची ईरटीगा गाडी रोखुन त्यांना गाडीसह पेट्रोलपंपाचे आवारात उजेडात नेवुन गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये बँटरी चोरी करीता लागणारे साहीत्य मिळुन आल्याने आरोपी चोरीच्या उद्देशाने वावरत असल्याबाबत खात्री झाल्याने चोरट्यांना जागेवर ताब्यात घेण्यात आले. यात अलीम उर्फ गुड्डु शेख खाजा, शेख हसन शेख मोहसीन रा. वडजी ता. रिसोड जि. वाशीम ह.मु. चिकलठाणा जि.छत्रपती संभाजीनगर, शुभम अशोक फतरे, राहुल उर्फ सुनील संजय मेहेर रा.चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली. या आरोपींच्या ताब्यातील ईरटीगा वाहन क्र. (एम.एच 04 जि.डी. 3526) सह पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरीचे गुन्हे केलेले असल्याचे त्यांचे चौकशीत निष्पन्न झाल्याने व चोरी केलेला मुद्देमाल खरेदी करणारे त्यांचे सहकारी नवाब ईमाम शहा, मोहम्मद अमीरोद्दीन अब्दुल गफ्फार यांच्यासह मौजपुरी पोलीस ठाण्यात कलम 303(2),317(2), 3(5) भा.न्या.सं. या गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडुन विविध गुन्ह्यातील चोरी केलेला
मुद्देमाल मोबाईल टॉवरच्या (19) बॅटर्या गुन्ह्यात वापरलेले वाहन, आरोपींचे मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींनी जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातुन मोबाईल टॉवरच्या बँटर्या चोरल्या असल्याने त्यांच्याकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी सध्या मौजपुरी पोलीस ठाण्यातील कलम 303(2) भा.न्या. सं गुन्ह्याामध्ये पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, परतुर उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, सहायक फौजदार प्रकाश जाधव, संतोष धायडे, ज्ञानोबा बिरादार, पोहेकॉ मच्छिद्र वाघ, राजेंद्र देशमुख, दिलीप गोडबोले, नितीन खरात, नामदेव जाधव, भगवान खरात, दादासाहेब हरणे, नितीन कोकणे, धोंडीराम वाघमारे, शैलेंद्र आडेकर, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, विनोद इंगळे यांनी केली.