बदनापूर – बदनापूर येथील कृषी महाविद्यालयातील जिजा मुलींच्या वस्तीगृहाने आज मैत्री दिवस साजरा करताना ज्याच्या आधारे आपण जगत आहोत, अशा आपल्या मौल्यवान झाडांचे वृक्षारोपण करून त्यांनी आगळा
वेगळा मैत्री दिवस साजरा केलेला आहे. काही मुलींनी झाडाखाली उगवलेले कडुलिंबाची झाड, कुलमोराची झाड, अमलताची
झाड, रिट्याची झाड, चिंचेची झाड असे झाडांना ज्या ठिकाणी झाडे नाही तिथे व्यवस्थित लावून वातावरण चांगले ठेवण्यासाठी हातभार लावलेला आहे. काळाची गरज बघता जमिनीचे तापमान अतिशय वाढत असल्यामुळे अशा परिस्थितीत झाडे लावूनच वातावरणातील उष्णता कमी करता येईल, असा मुलींचा अभ्यास असल्यामुळे
यावर्षी कशी जास्तीत जास्त बदनापुरातील झाडे वाढवण्यात येईल याचा मुलींनी विचार केला असून ती मैत्रीच्या रूपाने जोपासण्याचा आज त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
हा मैत्री दिवस साजरा करताना वस्तीगृहाच्या सहाय्यक वस्तीगृह अधीक्षिका एस.एम. झांबरे, वस्तीगृहाचे सुरक्षारक्षक प्रताप शिंदे व माणिक गजर हे उपस्थित होते. मुलांच्या याच पेरणीला प्रोत्साहन देऊन आपण सुद्धा आपल्या परिसरात झाडे लावा आणि वातावरणाची मैत्री जुळवा असा संदेश दिला.