बुधवारपासून जालना शहर महास्वच्छता अभियान राबविणार

17

महानगरपालिका, रोटरी क्लब कुंडलिका सीना फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार

जालना शहर महानगरपालिका प्रथम वर्धापन दिन तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जालना शहर महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ जालना आणि कुंडलिका सीना फाऊंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त्यमाने 7 ते 14 ऑगस्टदरम्यान दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
       हे अभियान एक सकारात्मक सुरूवात असून यापुढेही आपल्या जालना शहराला एक स्वच्छ महानगर म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महास्वच्छता अभियान राबण्यासाठी नोडल  अधिकाऱ्यांसह सहकर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, वार्डनिहाय नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी भोकरदन नाका ते भास्करराव दानवे यांचे घर, भोकरदन नाका ते राजुरी कॉर्नर व्हाया मुंडे चौक, भोकरदन नाका ते विशाल कॉर्नर, 8 ऑगस्ट रोजी बस स्टँड ते मुथा बिल्डिंग, बस स्टँड ते मामा चौक, मामा चौक ते महावीर चौक, महावीर चौक ते मुथा बिल्डिंग, मामा चौक ते दवा मार्केट, 9 ऑगस्ट रोजी सावरकर चौक ते टांगा स्टॅन्ड, सावरकर चौक ते विवेकानंद हॉस्पिटल सावरकर चौक ते अलंकार व्हाया महावीर चौक, 10 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिर ते बडी सडक, मुर्गी तलाव ते बाबुराव काळे चौक, बाबुराव काळे चौक ते कोठारी शाळा, कोठारी शाळा ते जेईएस महाविद्यालय, जेईएस महाविद्यालय ते दुर्गा माता मंदिर परिसर, 11 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंठा चौफुली, गुरुबचन चौक ते एस आर पी एफ गेट, गुरुबचन चौक ते हनुमान मंदिर, 12 ऑगस्ट रोजी मंमादेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन, मंमादेवी मंदिर ते गांधी  गांधी चमन, मंमादेवी मंदिर ते गरीबशहा बाजार चौक, मंमादेवी मंदिर ते पाणीवेश, 13 ऑगस्ट रोजी गांधी चमन ते रेल्वे स्टेशन, गांधी चमन ते शनी मंदिर, गाढे पुतळा ते दीपक हॉस्पिटल, गांधी चमन ते मोतीबाग, 14 ऑगस्ट रोजी उड्डाणपूल नूतन वसाहत ते रेल्वे स्टेशन, उड्डाणपूल नूतन वसाहत ते अंबड चौफुली, उड्डाणपूल नूतन वसाहत ते शनी मंदिर याप्रमाणे वार्डनिहाय जालना शहर महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
      15 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मनपाच्या सर्व वाहनांची रॅली काढण्यात येऊन, सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा त्यात सहभाग राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत या महास्वच्छता अभियानाची सांगता केली जाणार आहे. या अभियानात विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.
       सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी हातभार लावावा, असे आवाहन जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, रोटरी क्लब जालनाचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडिया, सचिव रवी भक्कड, प्रकल्प प्रमुख सुरेंद्र पित्ती, वर्षा पित्ती यांनी केले आहे.