अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छाईपुर्‍यात सामाजिक उपक्रमांचे आयोजन; युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

11

जालना । प्रतिनीधी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त युवानेते अक्षय गोरंट्याल यांच्या संकल्पनेतून शहरातील छाईपुरा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते अक्षय गोरंटयाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत क्युप्रेशर मशिन्सव्दारे तपासणी, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर पांजरापोळ गौशाळा येथे गौसेवा, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलतांना युवा नेते अक्षय गोरंटयाल म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सातत्याने गोर गरीब आणि वंचित असलेल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती करत लोकचळवळ उभी केली. अण्णाभाऊंचे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी अपेक्षा अक्षय गोरंटयाल यांनी येथे बोलतांना व्यक्त केली. याप्रसंगी सय्यद मुस्ताक, गोपाल चित्राल, रमेश साळवे, लालू भिसे, राहुल तुपसुंदर, डॉ.सचिन राठोड, बुरान शेख, राहुल ससाने, गणेश खंदारे, सुमित वानखडे, कुशाल खंदारे, अभिषेक खंदारे, रुपेश साळवे, सुनील ढक्का, निखिल लोखंडे,आदित्य तांबे, शुभम ठोकर, गणेश घोडे, राकेश साळवे, सचिन ससाने, सोनू घोडे, रोहन वानखडे, अलोक तुपसुंदर, सोनू घोडो, संदीप औरंगे, समीर अँथोनी आदींची उपस्थिती होती.