परतूर । प्रतिनिधी – पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्येकी दोन वृक्षाची लागवड केल्यास देशभरात हरित क्रांती होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. सुरूमगाव तालुका परतूर जिल्हा जालना येथे ग्रामसेवक संघटना तालुका परतुर व पंचायत समिती परतुर कर्मचारी यांच्यावतीने आयोजित वीस हजार घनदाट वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यास पिठावर भाजपा चे परतूर तालुका अध्यक्ष शत्रगुण पाटील कणसे भाजपा जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर विनायक लहाने आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवी सोळंके, संभाजी वारे, बाबाराव थोरात, तुकाराम सोळंके, मधुकर मोरे, सखाराम लहाने, सुभाष कोल्हे जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, तहसीलदार प्रतिभा गोरे, परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तांगडे, परतुर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष डीबी काळे, बाबाजी चव्हाण यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मनगुंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील गावागावात वृक्ष लागवडीचे झालेले कार्य अभिनंदनीय असून वृक्ष लागवडीची व्यापक चळवळ राज्यभरात अधिक गतीने निर्माण व्हावी याकरिता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण केलं पाहिजे. बांधावर आणि शेतीत वृक्ष लागवड करण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असून परतुर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त फळबागा आणि वृक्ष लागवड आणि बांधावरची वृक्ष लागवड केली पाहिजे. याकरिता आवश्यक निधी विविध योजनेला उपलब्ध करून देण्याकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन देखील आमदार लोणीकरांनी उपस्थितांना दिल. वृक्ष लागवडीचे महत्त्व उपस्थित त्यांना सांगताना आमदार लोणीकर म्हणाले की महाराष्ट्रात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी बांधवांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून शेतकर्यांच्या आत्महत्या कायमच्या थांबवायचे असतील महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायच असेल तर प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी.