अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा वंचित बहुजन आघाडीच्या स्वागत समितीचे आवाहन

6

जालना । प्रतिनिधी – येथील एका हॉटेलमध्ये शनिवार (दि 3) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे स्वागत समितीचे कार्याध्यक्ष अरुण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली आहे, ओबीसी समाज हा जनजागृती करण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे स्वतःहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत, रॅली काढतात. त्याच उद्देशाने येणार्‍या सहा तारखेला अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे जालना येथे येत आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता मंठा चौफुली येथे त्यांचे स्वागत होईल व रॅली काढून गांधी चमन येथे त्यांची सभा होणार आहे, ओबीसी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र वांजुळे, कार्याध्यक्ष अरुण गिरी, उपाध्यक्ष दत्तू कुरधने, भानुदास साळवे, वैभव वानखेडे, तालुका उपाध्यक्ष वीलास नरवडे, गौतम वाघमारे, मनोज शर्मा, दगडू जाधव, मुकेश निकाळजे, प्रवीण खंदारे, आकाश म्हस्के, गुड्डू गिरी, कृष्णा गायकवाड, मयूर निकम लखन चित्तेकर सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होती.