जालना – कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या बाबीच्या टाईल्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तरी शेतकर्यांनी ारहरवलीं.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जावून लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकर्याच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये कृषी निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची दि. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे तसेच कापूस साठवणूक बॅगेसाठी पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.