सहदिवाणी न्यायाधीश यांची भूमिका ठरली लक्षवेधी

15

जालना – जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे होत असलेल्या लोक अदालतमध्ये विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील एका प्रकरणामधील अर्जदार तडजोडीच्या हेतुने न्यायालयाच्या आवारात आल्या. परंतु सदर अर्जदार यांचे वय 80 वर्षे असल्यामुळे त्यांना पायर्‍या चढणे शक्य नसल्याने त्या न्यायालयाच्या आवारातच बसुन होत्या. ही बाब त्यांच्या वकीलांनी कळविल्यानंतर स्वतः सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.एन. जयस्वाल यांनी अर्जदाराकडे येवून त्यांच्या प्रकरणात तडजोड नोंदवली. तसेच दुसर्‍या एका प्रकरणात आजारी असलेली वृध्द महिला न्यायालयात येऊ शकत नसल्यामुळे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.एन.जयस्वाल यांनी त्यांच्या गाडीजवळ जावून त्या प्रकरणात तडजोड घडवुन आणली. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.