जालना । प्रतिनिधी – शिक्षणानंतर युवकांना शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. जालना जिल्हयात या योजनेला युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी उमेदवारांना अडचणी येऊ नयेत याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी फित कापून केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर स्थापन करण्यात आलेल्या या सहायता कक्षाच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भूजंग रिठे, कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे आदी उपस्थित होते.
राज्यातील युवा वर्ग आपले शिक्षण पूर्ण करुन दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या योजनेतंर्गत आता शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये युवक-युवतींना कार्य प्रशिक्षणाचा शिक्षणनिहाय विद्यावेतनासह लाभ घेता येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना हीींिीं://ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक प्राप्त करुन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवारांना 8 हजार रुपये आणि पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास हीींिीं://ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापुर्वी नोंदणी केली असल्यास महास्वयंम संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करुन विविध आस्थापनाकडील उपलब्ध रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणार्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. योजनेसंदर्भात काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कौश्ल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात तथा सहायता कक्षाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त श्री. रिठे यांनी कळविले आहे.