जालना | प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ जालना इलाईटतर्फे शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत जेईएस महाविद्यालयात श्रीक्षेत्र शेगांव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीतील भाविक दर्शनार्थींसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या श्रीक्षेत्र शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले असून, या पालखीचा दि. 2 ॲागस्ट रोजी जेईएस महाविद्यालयात मुक्काम राहणार आहे. त्यानिमित्त भक्तांसाठी या ठिकाणी रोटरी क्लब ॲाफ जालना इलाईटतर्फे मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पालखीतील भक्त आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची त्यात तपासणी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, सचिव अनया अग्रवाल, रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट डायबिटीज डायरेक्टर डॉ. राजेश सेठीया यांच्यासह रोटरी पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.