अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे 1,00,000 लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती

34

जालना । प्रतिनिधी – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून आज 1,00,000 मराठा उद्योजकांची संख्या पुर्ण झाली व महामंडळाचे 1,00,000 लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली. त्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांनी यथोचित सत्कार केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गतआजपर्यत 1,0014 लाभार्थी झाले असून,8320 कोटी रुपये बँकांनीव्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपयेव्याज परतावा केला आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालिनमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी अणासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळ पुनर्रचित केले व या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजनाबंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व यामहामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली. महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेता, लगेचच नरेंद्र अण्णासाहेबपाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुनमहामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन करुन मराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहातसामील केले. तसेच राष्ट्रियकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठामिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्यसरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदययांचेबरोबरच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रियकृत व सहकारीबँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीयसंचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिकनिकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले, त्यांचे सुपुत्र नरेंद्रपाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद व
उल्लेखनिय असेच आहे, हे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन सिध्द होत असून, याबाबतमंत्री महोदय यांनी देखिल त्यांच्या कार्याचे कौतुक केले.