तालुका क्रीडा संयोजकपदी शेख चाँद पी.जे. यांची नियुक्ती

58

जालना । प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने दरवर्षी तालुकास्तर ते राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तालुकास्तरावर स्पर्धांचे आयोजन सुरळीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी तालुका संयोजकांची नियुक्ती करण्यात येते. यावर्षीपासुन जालना तालुकास्तरावरील स्पर्धांच्या आयोजन नियोजनाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे. यांची नियुक्ती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी नुकतीच केली आहे. शेख चाँद पी.जे. हे गेल्या 22 वर्षापासुन क्रीडा कार्यरत असुन अनेक क्रीडा संघटनावर ते विविध पदावर कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातुन आजपर्यंत अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. शासनाच्या वतीने त्यांना तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट क्रीडा संघटकाचा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. शेख चाँद पी.जे. यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.