जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणार्या आरोपींची माहीती घेऊन त्यांचा शोध घेणेबाबत विशेष मोहीम राबविण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार केली.
जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणार्या आरोपींची माहीती घेऊन शोध घेत असतांना खबर्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरात इसम आदित्य राजु काटकर रा. लोधी मोहल्ला जालना व त्याचे इतर साथीदार यांनी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविलेल्या असुन सदर तलवारी आज बुधवार (दि 31) रोजी डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती माहीती वरिष्ठांना कळवुन हेड पोस्ट ऑफीस जालना येथे सापळा लावुन इसम नामे अदित्य राजु काटकर, मंगेश राजु काटकर हे पार्सल सोडवुन त्यांचे ताब्यात घेवुन पोस्ट ऑफीसच्या बाहेर येत असतांना आदित्य राजु काटकर व मंगेश राजु काटकर यांना ताब्यात घेतले. आरोपी नामे आदित्य राजु काटकर व मंगेश राजु काटकर यांना अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, दि. 15/07/2024 रोजी आम्ही व साथीदार असे सर्वजण अमृतसर येथुन शस्त्रविक्रीचे दुकानातुन मागविलेल्या एकुण 22 तलवारी तीन वेगवेगळ्या पार्सलमध्ये आज पोस्ट ऑफीस येथे आल्या आहेत. आमच्या जवळील बॉक्स सोडुन आणखी दोन बॉक्स पोस्ट ऑफीसमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोस्ट ऑफीस येथे खात्री केली असता तेथे दोन बॉक्स मिळुन आले ते चेक केले असता त्यामध्ये तलवारी मिळुन आल्या. एकुण 22 तलवारी अंदाजे 44,000/- रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनि राजेंद्र वाघ, संजय राऊत, भाऊराव गायके, रमेश राठोड, विजय डिक्कर, रुस्तुम जैवाळ, प्रशांत लोखंडे, सागर बावीस्कर, संभाजी तनपुरे, देविदास भोजणे, संदीप चिंचोले, सचिन राऊत, रवि जाधव, भागवत खरात, किशोर पुंगळे, धिरज भोसले, सौरभ मुळे यांनी केली.