जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र सेपाकटाकरा असोसिएशनच्या वतीने दिनांक 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान ठाणे येथे 34 व्या सिनीयर राज्य सेपाकटाकरा अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा सेपकाटाकरा असोसिएशनच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2024, गुरूवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन शिशु विहार इंग्लिश स्कुल, पेन्शनपुरा, कॉलेज रोड जालना या ठिकाणी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होणार्या खेळाडुंना जन्मतारखेचे बंधन नाही. सदर निवड चाचणीतुन 12 मुले व 12 मुलींची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतील. सेपाक टाकरा हा खेळ शालेय स्पर्धांमध्ये सहभागी असुन 10 वी व 12 वीत शिकत असलेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना ग्रेस गुण तसेच शासकीय व निमशासकीय नौकर्यांमध्ये 5 टक्के आरक्षणास पात्र आहे.
अधिक माहितीकरीता संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, अमोल काटकर, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती गिता संगम, गोवर्धन वाहुळ, सुभाष पारे, उमेशचंद्र खंदारकर, संतोष वाघ, नितीन जाधव, शेख समीर, सोहेल खान यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेपाकटाकरा असोसिएशन जालना, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन जालना व कला क्रीडा दूत फ ॉऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.