व्ही. एस .एस. चा विद्यार्थी विद्यापीठात प्रथम

18

जालना । येथील विंध्याचल शिक्षण संस्था संचलित व्ही. एस. एस. महाविद्यालयाने पदवी आणि पदव्युत्तर परिक्षेत यंदा ही उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून पदव्युत्तर परिक्षेतील भूगोल विषयात महाविद्यालयाच्या विद्यार्थी सर्वप्रथम आला आहे.

विद्यापीठातर्फे नुकताच पदव्युत्तर परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात व्ही. एस. एस. च्या भूगोल शाखेचा 95% निकाल लागला तर मनोज ढोकळे हा विद्यार्थी विद्यापीठातून प्रथम आल्याबद्दल त्यास विद्यापीठातर्फे विशेष धनादेश देण्यात आला. या शिवाय यंदा च्या शैक्षणिक वर्षात पदवी परिक्षेत महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा 95% तर तर बी. सी. ए. शाखेचा 80% निकाल लागला. सन 2007 साली स्थापन झालेल्या व्ही. एस. एस. महाविद्यालयास सन 2014 साली पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतही महाविद्यालयाने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन निकालात सातत्य राखले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब मदन, सचिव शिक्षण तज्ञ डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांच्या सह प्राध्यापक व कर्मचारी वृंदानी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.